S M L

डॉ. बिनायक सेन यांच्या सुटकेची मागणी

14 मे मानवी हक्कांसाठी काम करणारे डॉ. बिनायक सेन यांना छत्तीसगड सरकारने नक्षलवादी असल्याच्या संशयावरून अटक केली होती. ते नक्षलवादी नसून मानवी हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्यांना तुरूंगातून सोडण्यात यावं अशी मागणी भारतात आणि जगभरातून केली जातेय. गेली 2 वर्षं ते तुरूंगात आहेत. डॉ. सेन यांनी दुर्गम तसंच आदिवासी भागात गरिबांसाठी वैद्यकीय सेवा केली आहे. डॉ. सेन यांना 'जोनाथन मॅनऍवॉर्ड फॉर ग्लोबल हेल्थ अँड ह्युमन राईट्स' हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. हा पुरस्कार मिळाला तेव्हाही ते तुरूंगातच होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2009 08:32 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 14, 2009 08:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close