S M L

कोकण आणि मध्य रेल्वेच्या वादात तासभर खोळंबली 'डबलडेकर'

Samruddha Bhambure | Updated On: Aug 22, 2014 11:32 AM IST

कोकण आणि मध्य रेल्वेच्या वादात तासभर खोळंबली 'डबलडेकर'

22 ऑगस्ट :  कोकण रेल्वेच्या मार्गावरून आजपासून पहिली डबलडेकर ट्रेन सुरू झाली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसवरून निघालेल्या या ट्रेनला पहिल्याच दिवशी रोह्यात कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या वादाचा फटका बसला. कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेदरम्यान असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे ही डबलडेकर ट्रेन रोह्यात तासभर रखडली. कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेचा वाद प्रवाशांसाठी काही नवा नाही. मात्र, डबलडेकरचा आनंद घेण्यासाठी उत्साहात निघालेल्या प्रवाशांना मात्र या वादाचा फटका सहन करावा लागला आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनसहून रवाना झालेली रेल्वे ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळमार्गे करमाळीपर्यंत धावेल. रोज सकाळी साडेपाचला ही रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनहून रवाना होईल. या हॉलिडे स्पेशल ट्रेनचा गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणार्‍यांना मोठा फायदा होणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 22, 2014 11:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close