S M L

उरळी-फुरसुंगीच्या कचर्‍यावर निघाला तोडगा : आयबीएन-लोकमत इम्पॅक्ट

14 मे, पुणे पुण्यातल्या कचर्‍याच्या प्रश्नावर उरळी आणि फुरसुंगीचे गावकरी आणि जिल्हाधिकारी राजकीय नेते यांच्या बैठकीत तोडगा निघाला आहे. या बैठकीत उरळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावं दत्तक घेण्याची मागणी गावकर्‍यांनी केली होती. ती मान्य झाल्यामुळे गावकर्‍यांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी पालिकेच्या इतर वॉर्डांप्रमाणे गावांनाही ठरावीक विकास निधी मिळणार आहे. गावातली कचरा कुंडी पर्यायी जागेत हलवण्यात येणार आहे. जोपर्यंत पर्यायी जागा मिळत नाही तोपर्यंत डंपिंग ग्राऊन्ड सध्या आहेत त्या ठिकाणीच राहणार आहे. पण सात महिन्यांच्या आत डंपिंग ग्राऊंड हलवलं जाण्याचं आश्वासन गावकर्‍यांना जिल्हाधिकार्‍यांनी पुणे महानगर पालिकेने दिलं आहे. जर सात महिन्यांच्या आत डंपिंग ग्राऊंड हलवलं नाही तर उरळी देवाची आणि फुरसुंगी गावच्या गावक-यांनी आंदोलन अधिकच तीव्र केलं जाण्याची समज जिल्हाधिकार्‍यांना दिली आहे. आयबीएन-लोकमतने पुण्यातला खास करून उरळी देवाची-फुरसुंगी गावचा कचरा प्रश्न लावून धरला होता. गावकर्‍यांनी कचराविरोधी आंदोलन चांगलंच पेटवलं होतं. डंपिंग ग्राऊंड हलवण्यासाठी गावकर्‍यांनी ग्रामसभेत एक ठराव मांडला. त्या ठरावातलं निवेदन गावकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलं होतं. त्या निवेदनात गावकर्‍यांनी डंपिंग ग्राऊंडवर प्लास्टिक आणि काँक्रिटच्या मिश्रणाचं पूर्ण कव्हरिंग करावं आणि तिथं पुन्हा कचरा टाकण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. त्यामुळे प्रशासनाने गावकर्‍यांकडे चर्चेची मागणी केली होती. डंपिंग ग्राऊंडच्या प्रश्नावर प्रशासन तोडगा काढणार असेल तरच चर्चेला येऊ या भूमिकेवर गावकरी ठाम होते.त्यामुळे काल बुधवारी रात्री उशीरा महापौरांच्या निवासस्थानी पालिका अधिकारी, भाजप गटनेते, स्थायी समितीचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, पालकमंत्री अजीत दादा पवार आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना बैठक घ्यावी लागली. त्यात ही गावं दत्तक घेऊन, त्यांच्यासाठी विकास निधी देण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. त्या बैठकीत घेतलेला अंतीम निर्णय आज जिल्हाधिकार्‍यांनी गावकर्‍यांना सांगितला. उरळी देवाची आणि फुरसुंगीच्या गावकर्‍यांनी कचर्‍याच्या प्रश्नावर सुरू केलेल्या आंदोलनानंतर अखेर आठवड्याभरानंतर पालिका प्रशासन जागं होताना दिसत आहे. गावं दत्तक घेण्याच्या पालिकेच्या प्रस्तावावर 15 मेला शुक्रवारी होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा होऊन नंतरच हा प्रस्ताव मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत पाठवण्यात येणार असल्याचं समजतं आहे. आयबीएन-लोकमतने प्रकरण लावून धरल्यामुळे आम्हाला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत गावकर्‍यांनी चॅनेलचे आभार मानले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2009 12:07 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 14, 2009 12:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close