S M L

किरण जाधव आत्महत्येच्या निषेधार्थ 4000 डॉक्टर रजेवर

Sachin Salve | Updated On: Aug 23, 2014 12:12 PM IST

doctor23 ऑगस्ट : सोलापूरमध्ये डॉ. किरण जाधव यांच्या आत्महत्येप्रकरणी मार्डचे 4000 डॉक्टर आज सामूहिक रजेवर गेले आहेत. डॉक्टरांच्या आत्महत्येप्रकरणी संबंधितांवर कारवाईची मागणी त्यांनी केलीय.

दरम्यान, सोलापूर जनरल मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. अशोक शिंदे यांच्या बदलीचा प्रस्ताव मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मान्यतेसाठी पाठवल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय. सध्या त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. सोलापूरमध्ये डॉ.

वैशंपायन स्मृती मेडिकल कॉलेजमधले निवासी डॉक्टर किरण जाधव यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणी चार वरिष्ठ डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. डॉ. किरणना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. पण सोलापूर जिल्हा न्यायालयानं त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. दुसरीकडे डॉ. किरण जाधव यांच्या आईला अहमदनगरमधल्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यांना 50 लाख रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी मार्डच्या डॉक्टरांनी केलीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 23, 2014 12:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close