S M L

दलित मतांशिवाय सत्तेत येऊ असा गैरसमज ठेवू नका-आठवले

Sachin Salve | Updated On: Aug 23, 2014 01:53 PM IST

दलित मतांशिवाय सत्तेत येऊ असा गैरसमज ठेवू नका-आठवले

ramdas athavale on sena23 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीसाठी जागा कमी देऊन दलित मतांशिवाय सत्तेत येता येईल अशी भावना असेल तर ती शिवसेना आणि भाजपने मनातून काढून टाकावी अशा सुचक शब्दात रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवसेना भाजपाला इशारा दिलाय.

विधानसभेत 20 जागा देणं अशक्य असेल तर विधानपरिषदेच्या जागा द्या, अशी मागणीही आठवलेंनी केलीय. काँग्रेससोबत असताना आपण 1990 मध्ये 12 जागा लढवल्या होत्या आता पक्षाची ताकद वाढलीय ही आठवणही आठवलेंनी करुन दिलीय. आयबीएन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत रामदास आठवलेंनी रोखठोक मतं मांडलीय.

विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी महायुतीचा घटक पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनीही जागावाटपाबाबत होणारा विलंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या सेना प्रवेशावर टीका केली होती. त्यानंतर आता रामदास आठवले यांनीही नाराजीचे संकेत देत जागावाटप लवकर करा असा इशारा दिलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 23, 2014 12:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close