S M L

बबन घोलप निवडणूक लढवण्यास अपात्र

Sachin Salve | Updated On: Aug 23, 2014 02:37 PM IST

बबन घोलप निवडणूक लढवण्यास अपात्र

baban gholap23 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे आमदार बबन घोलप यांचा पाय आणखी खोलात गेलाय. निवडणूक लढवण्यास बबन घोलप यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे.

याबाबत अध्यादेश काढण्यात आला आहे. राज्यपालांचा 28 जुलैचा हा अध्यादेश आहे. त्यामुळे निवडणुकीचे दार बबन घोलप यांच्यासाठी तुर्तास बंद झाले आहे. मात्र राज्यपालांच्या या अध्यादेशाला आव्हान देत घोलपांनी कोर्टात धाव घेतली आहे.

आपल्याला निवडणूक लढू द्यावी अशी परवानगी मागितली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 26 ऑगस्टला होणार आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी बबन घोलप यांना कोर्टाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पूर्ण चौकशी अंती राज्यपाल के. शंकर नारायणन यांनी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना पत्र पाठवून या दोघांची आमदारकी रद्द करण्याचे निर्देश दिले होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 23, 2014 01:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close