S M L

काँग्रेसला धक्का, राणेंचे समर्थक बने आणि कदम शिवसेनेच्या वाटेवर

Sachin Salve | Updated On: Aug 23, 2014 07:56 PM IST

काँग्रेसला धक्का, राणेंचे समर्थक बने आणि कदम शिवसेनेच्या वाटेवर

rane kokan23 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला उधाण आलंय. काँग्रेसचे नेते नारायण राणेंना आणखी एक धक्का बसलाय. काँग्रेसचे नेते आणि नारायण राणे यांचे समर्थक सुभाष बने, गणपत कदम शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

काँग्रेसमध्ये त्यांना कुठलंही पद दिलं गेलं नाही. त्यामुळे ते नाराज होते. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ते स्वगृही परत येतायत. येत्या सोमवारी सुभाष बने, गणपत कदम शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे माजी पदाधिकारीही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

विशेष म्हणजे नारायण राणे यांची काँग्रेसच्या प्रचारसमितीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आलीय. आपल्या दोन्ही मुलांच्या उमेदवारीवरुन वाद निर्माण झाला होता. नितेश राणे यांना माघार घ्यावी लागली आहे तर निलेश राणे अजूनही तिकीटाच्या प्रतिक्षेत आहे. गेल्या आठवड्याभरापासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील नाराजांनी शिवसेनेची वाट धरली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 23, 2014 07:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close