S M L

ज्याला बाप मानलं त्यांनीच मान कापली -सूर्यकांता पाटील

Sachin Salve | Updated On: Aug 24, 2014 07:53 PM IST

ज्याला बाप मानलं त्यांनीच मान कापली -सूर्यकांता पाटील

23 ऑगस्ट : ज्याला बाप मानलं त्यानेच माझी मान कापली अशा शब्दात राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या सूर्यकांता पाटील यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केलीये.

लोकसभेचे तिकीट कापले गेल्यानंतर विधान परिषदेवर घेण्याचे आश्वासन त्यांना पक्षाकडून मिळाले होते. परंतु विधान परिषदेतही वर्णी न लागल्याने सूर्यकांता पाटील नाराज आहे. त्या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. पण त्यांनी याबाबत अजून मौन बाळगले होते.

आज पहिल्यांदाच त्यांनी मौन सोडत थेट शरद पवार यांच्यावरच टीका केलीये. सूर्यकांता शिवाय उमेदवार कोणीच असणार नाही असं साहेबांनी सांगितलं होतं पण साहेबांनीच माझा विश्वासघात केला. ज्याला बाप मानल त्यांनीच माझी मान कापली अशी जहरी टीका त्यांनी शरद पवारांवर केली.

तसंच जे दोन दोन लाख मतांनी हरले ते 13 व्या दिवशी राज्यसभेवर जातात. जे पराभूत झाले ते प्रदेशाध्यक्ष होतात तर मी कुठे कमी पडले अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी जाहीर व्यक्त केली.

दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हावा असं वक्तव्य केलं होतं. सूर्यकांता पाटील यांनी सिंह यांच्या विधानाला पाठिंबा देत बंडाचे निशाण फडकावले होते. दरम्यान, सूर्यकांता पाटील यांच्याशी चर्चा करुन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 23, 2014 08:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close