S M L

के. शंकरनारायणन यांनी दिला राज्यपालपदाचा राजीनामा

Samruddha Bhambure | Updated On: Aug 24, 2014 08:00 PM IST

 के. शंकरनारायणन यांनी दिला राज्यपालपदाचा राजीनामा

24 ऑगस्ट : महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन थेट मिझोरामच्या राज्यपालपदावर बदली झाल्याने नाराज असलेले के. शंकरनारायणन यांनी आज (रविवारी) दुपारी राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. मिझोरामला जाण्यास नकार देत के. शंकरनारायण यांनी राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा पाठवला आहे.

मोदी सरकारने शनिवारी रात्री उशीरा महाराष्ट्राचे राज्यपाल के.शंकरनारायणन यांची मिझोरामच्या राज्यपालपदी तडकाफडकी बदली होती. केंद्रात एनडीएची सत्ता आल्यापासून मोदी सरकारने यूपीएने नेमणुक केलेल्या राज्यपालांना हटवण्याची मोहीमच सुरू केली आहे. यानंतर मोदी सरकरने शंकरनारायणन यांना थेट मिझोरामच्या राज्यपालपदी पाठवून दिले त्याबद्दल के. शंकरनारायणन नाराज होते.

के. शंकरनारायण यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा कालावधी 2017 साली संपणार होता. परंतू मिझोरामच्या राज्यपाल कमला बेनिवाल यांना निलंबित केल्यापासून ही जागा रिकामी होती. त्याआधी मिझोरमचे राज्यपाल वक्कोम पुरुषोथमन यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती तर उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी.एल. जोशी यांनाही असच आपलं पद साडाव लागल होतं.

दरम्यान, के. शंकरनारायणन यांच्याऐवजी गुजरातचे राज्यपाल ओमप्रकाश कोहली यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. कोहली यांचा शपथविधी सोमवारी घ्यावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे केली होती. मात्र केंद्र सरकारने ही मागणी फेटाळून लावत कोहली आज (रविवारी) रात्रीचं राज्यपालपदाची शपथ घेणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 24, 2014 05:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close