S M L

सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते रिचर्ड अटेनबरो यांचं निधन

Samruddha Bhambure | Updated On: Aug 25, 2014 03:07 PM IST

सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते रिचर्ड अटेनबरो यांचं निधन

25 ऑगस्ट :  'गांधी' या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीयांच्या मनात घर करणारे ब्रिटिश सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते रिचर्ड अटेनबरो यांचं काल लंडनमध्ये निधन झालं. 90 वषच्य रिचर्ड हे गेले काही दिवस आजारी होते.

सहा वर्षांपूर्वी त्यांना स्ट्रोक आला आणि ते अनेक दिवस कोमात होते. यानंतर ते व्हीलचेअरचवर होते. या स्ट्रोकमधून ते पूर्ण बरे होऊ शकले नाहीत. रिचर्ड हे हॉलीवूडमधील यशस्वी दिग्दर्शक तर होतेच पण त्याचसोबत ते उत्कृष्ट अभिनेतेही होते. त्यांनी अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून अनेक यशस्वी चित्रपट दिले. रिचर्ड अटेनबरो यांनी 'गांधी' या 1982 साली आलेल्या अजरामर चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटासाठी त्यांना ऑस्कर पुरस्कारही मिळाला होता. या चित्रपटात बेन किंग्जले यांनी महात्मा गांधींची तर रोहिणी हट्टंगडी यांनी कस्तुरबा गांधींची भूमिका साकारली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 25, 2014 11:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close