S M L

पंतप्रधानपदासाठी शरद पवारांचं जोरदार लॉबिंग

15 मे, पंतप्रधानपदासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार फिल्डींग लावली आहे. मात्र एकीकडे शरद पवारच पंतप्रधान होतील असा दावा करायचा तर दुसरीकडे पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असं सांगायचं. ही वक्तव्यं म्हणजे राष्ट्रवादीचा पवारांना पंतप्रधान बनवण्यासाठी करण्यात आलेला डबल गेम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादीमध्ये घडणार्‍या हालचालींचा वेग वाढला आहे. याविषयी 'युपीएचं सरकार सत्तेत येईल किंवा नाही हे सांगता येत नसलं, तरी काँग्रेस पक्षाचा पंतप्रधान होणार नाही. याऊउलट डावे, सपा, जयललिता, नवीन पटनाईक यांच्या पाठिंब्यावर शरद पवार पंतप्रधान बनू शकतात', असं राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस गोविंदराव आदिक यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलं. त्यावेळी त्यांनी या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही आघाडीला बहुमत मिळणार नाही असा अंदाज व्यक्त केला. सध्या राष्ट्रवादीला समाजवादी पक्ष, शिवसेना यांनी पाठिंबा जाहीर केला असला तरी काँग्रेसने उदार मनाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यास ही स्थिती बदलेल असंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस गोविंदराव आदिक यांनी केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी शरद पवार पंतप्रधान होण्यासाठी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव तर करेलच पण वेळ पडलीच तर राष्ट्रवादी पाठिंबा मिळवण्यासाठी सौदेबाजीही करण्याची तयारी दाखवेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2009 01:07 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2009 01:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close