S M L

विद्यासागर राव महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

Sachin Salve | Updated On: Aug 26, 2014 03:48 PM IST

विद्यासागर राव महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

maharashtra governor vidhyasagar rao26 ऑगस्ट : अखेर महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळाले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या तत्कालिन मंत्रिमंडळातील गृहराज्यमंत्री विद्यासागर राव यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी निवड करण्यात आली आहे.

राय यांच्यासह गोवा, कर्नाटक आणि राजस्थानच्या राज्यपालांचीही घोषणा करण्यात आली आहे. माजी राज्यपाल के शंकरनारायन यांची मिझोरामला बदली करण्यात आली होती. याबदलीला धुडकावून लावत शंकरनारायन यांनी राजीनामा दिला. आज त्यांचा राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वीकारलाय. त्यानंतर नव्या राज्यपालांची घोषणा करण्यात आली.

विद्यासागर राव हे आंध्र प्रदेशमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्या तत्कालीन मंत्रिमंडळात त्यांनी गृहराज्यमंत्रीपद भूषवलं आहे.

12 व्या आणि 13 व्या लोकसभेत आंध्रप्रदेशातून निवडून आले होते तर आंध्रप्रदेशात तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहे. तर भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याणसिंह यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून सूत्रं हाती घेतील. मृदुला सिन्हा या गोव्याच्या राज्यपाल असतील. तर वजुभाई वाला यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी निवड करण्यात आलीय.

कोण आहेत विद्यासागर राव ?

- विद्यासागर राव हे आंध्र प्रदेशमधले भाजपचे नेते

- वाजपेयींच्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री

- 12 व्या आणि 13 व्या लोकसभेत आंध्र प्रदेशातून निवडून आले

- आंध्र प्रदेशात तीन वेळा आमदार

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 26, 2014 03:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close