S M L

आघाडीत रस्सीखेच सुरूच, राष्ट्रवादीपुढे 120-168चा फॉर्म्युला !

Sachin Salve | Updated On: Aug 26, 2014 09:12 PM IST

cm_on_ncp26 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहे मात्र दुसरीकडे अजूनही काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जागांसाठीची रस्सीखेच सुरूच आहे. जागावाटपावरुन सुरू असलेल्या वादानंतर आता काँग्रेसने राष्ट्रवादीसमोर 120-168 अशा वाटपाचा प्रस्ताव ठेवला आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीला 6 जागा वाढवून द्यायला तयार झालीय. 2009 मध्ये आघाडीमध्ये 114-174 जागांचा फॉर्म्युला होता. आता मात्र काँग्रेसकडून राष्ट्रवादीला आघाडीच्या बोलणीसंदर्भात निर्वाणीचा इशारा देण्यात आलाय.

आघाडी करायची असेल तरच पुढची बोलणी होतील अशी सूचना माणिकराव ठाकरे राष्ट्रवादीला करणार असल्याचं समजतंय. राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसही सर्वच सर्व 288 जागांसाठी मुलाखती घेणार आहे. आणि राहिलेल्या 114 जागांच्या मुलाखतींसाठी हायकमांडकडे परवानगी मागण्यात येणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 26, 2014 06:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close