S M L

कोणत्याही विघ्नाविना 'मेट्रो 3'चं भूमिपूजन

Sachin Salve | Updated On: Aug 26, 2014 08:54 PM IST

कोणत्याही विघ्नाविना 'मेट्रो 3'चं भूमिपूजन

26 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधार्‍यांनी विकासकामाच्या शुभारंभाचा धडाका लावलाय. आज मुंबई मेट्रोच्या तिसर्‍या टप्प्याचं भूमिपूजन कोणत्याही विघ्नाविना पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू हे उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री आणि केंद्रीय नगरविकास मंत्री या दोघांनीही केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रितपणे काम करण्यावर भर दिला. गेल्याच आठवड्यात नागपूरमध्ये मेट्रोच्या भूमिपूजनावर मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार टाकला होता. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे आजच्या कार्यक्रमात टीकाही केली. एकंदरीत कार्यक्रम कोणत्याही कटुतेविना पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य देशात सर्वात आघाडीवर असल्याचा पुनरुच्चार केला.

तर व्यंकय्या नायडू यांनी मुंबई आणि ठाण्याला मेट्रोने जोडण्याचा प्रस्ताव असल्याचं सांगितलंय. तसंच पृथ्वीराज चव्हाण यांच्या आमंत्रणावरुन मी कार्यक्रमाला आलो. या कार्यक्रमातून केंद्र आणि राज्य सरकार हातात हात घालून काम करतंय हा संदेश आम्हांला द्यायचा आहे असा खोचक टोला व्यंकय्या नायडू यांनी लगावला.

तसंच राजकारण निवडणुकीपर्यंत मर्यादित ठेवले पाहिजे. पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे आपण केंद्र आणि राज्यसरकारनं 'टीम इंडिया' म्हणून काम करायला हवं आपण सर्वजण देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत त्यामुळे गरिबांच्या विकासासाठी एकत्र यावं असं आवाहनही त्यांनी केलं. मुख्यमंत्री मेट्रो तीनच्या भूमिपूजनाला आल्याबद्दल नायडूंनी आभारही मानले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 26, 2014 05:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close