S M L

मुंबई-गोवा महामार्गावर एसटीला अपघात; १ ठार

Samruddha Bhambure | Updated On: Aug 27, 2014 11:48 AM IST

मुंबई-गोवा महामार्गावर एसटीला अपघात; १ ठार

27 ऑगस्ट :  मुंबई-गोवा महामार्गावर आज (बुधवारी) सकाळी वालोपेजवळ एसटी चालकाचे नियंत्रण सुटून बसला अपघात झाला आहे. यात एक जण ठार, तर 15 जण जखमी झाले आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांवर काळाने घात घातला आहे.

बोरिवली - साखरपा ही बस मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बोरिवली आगारातून निघाली होती. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास चिपळूणजवळील वालोपेजवळ बस उलटली. या अपघातात एक प्रवासी ठार झाला आहे. तर जखमी प्रवाशांवर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र एकीकडे कोकण रेल्वेने दगा दिला असतानाच आता एसटी बसलाही अपघात होत असल्याने कोकणात जाणारे चाकरमानी हवालदील झाले आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 27, 2014 11:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close