S M L

आम्ही 288 जागांसाठी मुलाखती घेतल्याच नाही -पवार

Sachin Salve | Updated On: Aug 27, 2014 04:53 PM IST

sharad pawar neeee27 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसने 288 जागांच्या मुलाखती घेतल्या नसल्याचे खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे स्पष्ट केलंय. पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांच्यात मंगळवारी फोनवरून चर्चा झाली. त्यात राष्ट्रवादीच्याच कोट्यातल्या 114 जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्याचं पवारांनी काँग्रेसला सांगितलंय.

तसंच दिल्लीत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आघाडीची चर्चा सुरू असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली. राष्ट्रवादीने गुपचूप 288 जागेसाठी मुलाखती घेण्यास सुरूवात केली असा आरोप माणिकराव ठाकरे यांनी केला होता.

राष्ट्रवादीचं वागणं हे योग्य नसून आघाडी तोडण्याचा इशारा ठाकरे यांनी दिला होता. मात्र शरद पवारांनी ठाकरेंचा दावा खोडून काढला आहे. अशा कोणत्याही मुलाखती झाल्या नाही असं स्पष्टीकरणच पवारांनी दिलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 27, 2014 04:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close