S M L

काँग्रेस-राष्ट्रवादीत शह-काटशहाचं राजकारण !

Sachin Salve | Updated On: Aug 27, 2014 06:46 PM IST

manirao on pawar27 ऑगस्ट : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीवर शिक्कामोर्तब होण्यापूर्वीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शह-काटशहाचं राजकारण खेळलं जातंय.

राष्ट्रवादीने 114 जागांसाठीच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्याचे खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच मुख्यमंत्र्यांकडं मंगळवारी स्पष्ट केलं. त्या नंतरही काँग्रेसचं समाधान झालेलं नाही. आता काँग्रेसही उरलेल्या 114 जागांची चाचपणी करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिलीय.

येत्या 31 ऑगस्टला म्हणजे रविवारी राष्ट्रवादीकडच्या 114 मतदारसंघांची चाचपणी करण्यासाठी इच्छुक उमेदवारांशी चर्चा करण्यात येणार आहे, असं माणिकराव ठाकरे यांनी सांगितलंय. पण प्रत्यक्षात चाचपणीच्या आडून काँग्रेस उरलेल्या 114 जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार असल्याचं समजतंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 27, 2014 06:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close