S M L

कोण कोणत्या आहेत आघाड्यांच्या शक्यता ?

15 मे निवडणुकीचे निकाल लागायला आता अवघे काही तासच उरले आहेत. मग खेळ सुरू होईल तो आघाड्यांचा. सगळ्या पक्षांचे सगळे पर्याय खुले आहेत. त्यामुळे आघाड्यांच्या काय शक्यता आहेत याकडेही सगळ्यांच लक्ष लागलं आहे. पहिली शक्यता आहे, डाव्यांच्या पाठिंब्याशिवाय काँग्रेसप्रणित आघाडी सरकार येणं. यासाठी काँग्रेसला 180 जागा मिळवणं गरजेचं आहे. काँग्रेसने 180 जागा मिळवल्या तर 272 चा आकडा गाठण्यासाठी काँग्रेसचे संभाव्य साथीदार राष्ट्रवादी काँग्रेस , चौथी आघाडी , तृणमूल काँग्रेस, जनता दल सेक्युलर, टी. आर.एस, इतर छोटे पक्ष असणार आहेत. या पक्षांची ताकद कमी पडली तर बसप चौथ्या आघाडीची म्हणजे लालू, पासवान यांची जागा घेऊ शकेल. जर जास्त जागा मिळाल्या तर जयललितांचा अण्णा द्रमुक पक्ष द्रमुकची जागा घेऊ शकेल.दुसरी शक्यता आहे, डाव्यांच्या पाठिंब्यासह काँग्रेसचं सरकार. निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर काँग्रेसनं केलेल्या आघाडीनं एनडीएपेक्षा जास्त जागा मिळवल्या तरच हे शक्य आहे. या आघाडीचे संभाव्य साथीदार राष्ट्रवादी काँग्रेस , चौथी आघाडी , जनता दल सेक्युलर, टी. आर. एस आणि इतर छोटे पक्ष असतील. पण डाव्यांचा पाठिंबा घेतला तर काँग्रेसला तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी द्यावी लागेल. काँग्रेसने एआयडीएमकेच्या जयललितांची साथ धरली तर डीएमके काँग्रेसला सोडेल. तिसरी शक्यता आहे, शरद पवारांच्या नेतृत्वाखालचं सरकार येण्याची. काँग्रेस किंवा भाजपचा पाठिंबा मिळाला तरच हे शक्य आहे. या आघाडीचे संभाव्य साथीदार तिसरी आघाडी आणि चौथी आघाडी असतील. भाजपने पाठिंबा दिला तर डावे पाठिंबा देणार नाहीत. पण मग एनडीएचे साथीदार मिळू शकतात. शिवसेनेनं आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. आणि चौथी शक्यता भाजपप्रणित आघाडी सरकारची. भाजप जोपर्यंत स्वबळावर 185चा आकडा पार करत नाही तोपर्यंत हे कठीणच दिसत आहे. या आघाडीचे संभाव्य साथीदार एनडीएचे घटक पक्ष, अण्णा द्रमुक, तृणमूल कँाग्रेस, तेलुगु देसम असतील. समाजवादी पक्ष किंवा बसप कदाचित सहभागी होऊ शकतात. भाजपनं ओरिसा विधानसभेत पाठिंबा द्यावा या आशेवर बिजू जनता दल पाठिंब्याचा विचार करू शकेल.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2009 04:46 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2009 04:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close