S M L

रैनाने केली दैना, भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय

Sachin Salve | Updated On: Aug 27, 2014 11:45 PM IST

रैनाने केली दैना, भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय

raina27 ऑगस्ट :टेस्ट सीरिजमध्ये लाजिरवाण्या पराभावानंतर अखेर भारताने वनडे सीरिजमध्ये विजयी सुरुवात केलीय. कार्डिफमध्ये दुसर्‍या वनडेमध्ये सुरैश रैनाच्या दमदार शतकी खेळीमुळे भारताने इंग्लंडचा 133 धावांनी धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवलाय. भारताने दिलेल्या 305 धावांचा पाठलाग करणारा इंग्लंड संघ अवघ्या 161 धावांवर गारद झाला.

पावसाचा आजच्या मॅचमध्येही व्यत्यय आला त्यामुळे ही मॅच 47 ओव्हर आणि धावांचं लक्ष्य 295 करण्यात आलं. पण टेस्ट सीरिज खिशात गुंडाळणार्‍या इंग्लंडने लोटांगण घेत पराभूत झाला. आजच्या दुसर्‍या टेस्टमध्ये इंग्लंडने टॉस जिंकून बॉलिंग घेतली पण हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. भारताने 305 धावांचा डोंगर रचला. भारताकडून सुरेश रैनाने दमदार सेंचुरी ठोकली. रैनाने 75 बॉल्समध्ये 12 फोर आणि 3 सिक्स लगावत आपलं शतक पूर्ण केलंय.

त्याअगोदर मात्र भारताला खराब बॅटिंगचा फटका बसला. भारताचा ओपनर शिखर धवन 11 तर विराट कोहली भोपळाही न फोडता पॅव्हेलियनमध्ये परतला. पण त्यानंतर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेनं भारताची इनिंग सांभाळली. पण जम बसल्यानंतरही पुन्हा एकदा एका खराब शॉटवर अजिंक्य रहाणेची विकेट गेली. रहाणेनं 41 रन्स केले. तर रोहित शर्माने संयमी खेळ करत आणि आपला फॉर्म पुन्हा एकदा मिळवत हाफ सेंच्युरी ठोकली. पण 52 रन्सवर तोही पॅव्हेलियनमध्ये परतलाय. त्यानंतर कॅप्टन महेंद्रसिंग धोणीने भारतीय टीमची कमान सांभाळात 52 रन्स केलेत. भारतीय टीम निर्धारीत 50 ओव्हरमध्ये 6 विकेटवर 305 धावांचा टप्पा गाठला.

305 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाची खराब सुरुवात झाली. अवघ्या 85 रन्सवर 5 विकेट अशी अवस्था इंग्लंडची झाली होती. त्यानंतर मात्र 'आयाराम गयाराम' अशीच अवस्था इंग्लंडची झाली. भारताच्या भेदक गोलांदाजीपुढे इंग्लंडचा एकापाठोपाठ एक खेळाडूने पव्हेलियनाचा रस्ता धरला. भारताकडून आर.जाडेजाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या तर मोहम्मद सामी, आर.आश्विन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. पाच वनडे च्या सीरिजमध्ये भारताने 1-0 ने आघाडी घेत दणदणीत विजयाची नोंद केलीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 27, 2014 11:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close