S M L

बबनराव पाचपुते अपक्ष म्हणून रिंगणात

Sachin Salve | Updated On: Aug 28, 2014 04:17 PM IST

बबनराव पाचपुते अपक्ष म्हणून रिंगणात

babanrao pachpute28 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे माजी मंत्री बबनराव पाचपुते विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात अपक्ष म्हणून उतरणार आहे. बबनराव पाचपुते यांनी आयबीएन लोकमतशी बातचीत करताना आपण अपक्ष म्हणून लढणार असल्याचं जाहीर केलंय.

कार्यकर्त्यांची मागणी असल्याने आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं पाचपुतेंनी स्पष्ट केलं. आमच्याकडे नेते कमी आहेत आणि कार्यकर्ते जास्त आहे. त्यांना आपण निवडून येऊ शकतो असा विश्वास आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भूमिकेचा आपण आदर करतो. आपल्याला काही ठिकाणाहून निमंत्रण आली आहेत पण कार्यकर्त्यांचा मान राखणं हे मला अधिक योग्य वाटतं असंही पाचपुते म्हणाले.

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पाचपुते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता होती. भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनीही पाचपुते लवकरच भाजपमध्ये येतील असं जाहीर केलं होतं पण आता पाचपुतेंनीच आपण अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार असल्याचं जाहीर केलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2014 04:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close