S M L

...नाहीतर ईव्हीएम मशीन बंद करा, काँग्रेसची मागणी

Sachin Salve | Updated On: Aug 28, 2014 04:25 PM IST

evm machin28 ऑगस्ट : मतदानाच्या वेळी ईव्हीएम मशीनने मतदान केल्यानंतर नोंदणी पावती मिळाली पाहिजे. नाहीतर ईव्हीएम मशिन्स बंद करून मतपत्रिकेद्वारे मतदानाची जुनी पद्धत अंमलात आणा, अशी मागणी काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे केली आहे.

शिवाय परराज्यातून ईव्हीएम मशिन्स आणण्याला काँग्रेसने तीव्र विरोध केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या ईव्हीएम मशिन्स असतानासुद्धा परराज्यातून या मशिन्स पुन्हा का आणल्या जात आहेत, असा सवालही काँग्रेस निवडणूक आयोगाकडे केलाय.

मतदाराने मतदान केलं की नाही याची हमी काय ? लोकसभा निवडणुकीत बोगस मतदानाचे प्रकार घडले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुका लक्षात घेता मतदारांना पावती द्यावी अशी मागणी काँग्रेसची असल्याचं काँग्रेसचे प्रवक्त सचिन सावंत यांनी सांगितलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2014 04:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close