S M L

लिंगायत समाजाच्या 12 पोटजातींचा ओबीसींमध्ये समावेश

Sachin Salve | Updated On: Aug 28, 2014 07:55 PM IST

लिंगायत समाजाच्या 12 पोटजातींचा ओबीसींमध्ये समावेश

lingayat28 ऑगस्ट : लिंगायत समाजाच्या 12 पोटजातींचा ओबीसींमध्ये समावेश करण्याची शिफारस राज्य मंत्रिमंडळाने राज्य मागासवर्ग आयोगाकडे केली आहे.

तसंच लिंगायत समाजाला अल्पसंख्याकांचा दर्जा देण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्याचा निर्णय राज्य सरकराने घेतला आहे. राज्य मागासवर्ग आयोग या शिफारसीसंदर्भात विचार करून योग्य ती कार्यवाही करणार आहे.

ज्या पोटजातींचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावा अशी शिफारस करण्यात आलीय त्यामध्ये लिंगायत,लिंगायत रेड्डी, लिंगायत कानोडी,लिंगडेर/ लिंगधर,लिंगायत शीलवंत,लिंगायत दीक्षावंत, लिंगायत पंचम, लिंगायत चतुर्थ, हिंदू लिंगायत, हिंदू वीरशैव, वीरशैव लिंगायत, लिंगायत टिराळी या पोटजातींचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसांपासून लिंगायत समाजाने यासाठी आंदोलन छेडले होते. लिंगायत समाजाला धर्म म्हणून मान्यता देण्यात यावं, लिंगायत समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा देण्यात यावा, लिंगायत समाजाच्या सर्व 307 पोटजातींचा ओबीसीत समावेश करावा अशी मागण्या लिंगायत समाज संघर्ष समितीने केल्या आहे.

ओबीसीसाठी या पोटजातींचा शिफारस

 • लिंगायत
 • लिंगायत रेड्डी
 • लिंगायत कानोडी
 • लिंगडेर/ लिंगधर
 • लिंगायत शीलवंत
 • लिंगायत दीक्षावंत
 • लिंगायत पंचम
 • लिंगायत चतुर्थ
 • हिंदू लिंगायत
 • हिंदू वीरशैव
 • वीरशैव लिंगायत
 • लिंगायत टिराळी

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2014 07:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close