S M L

बाप्पाचं उत्साहात आगमन

Samruddha Bhambure | Updated On: Aug 25, 2017 10:33 AM IST

बाप्पाचं उत्साहात आगमन

28 ऑगस्ट : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' या गजरात गुरुवारी रात्रीपासून मुंबईकरांनी गणपतीचं जल्लोषात स्वागत करायला सुरूवात केली आहे. गुलालाची उधळण, फटाक्यांची आणि ढोल-ताशाच्या गजरात घरोघरी आणि मंडपस्थळी गणरायाचे जल्लोषात आगमन झाले आहे. आगमन सोहळ्यात कसलीही कमी पडू नये यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते काळजी घेत होते. दरम्यान, 'लालबागच्या राजा'चे पहिल्याच दिवशी दर्शन घेता यावे यासाठी भाविकांनी गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून रांग लावली. कोकणात तर गणेशोत्सवाची धूम काही औरच असते, खास गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमाने कोकणात जातात. इथेही बाप्पांना घरी आणण्याची लगबग काल संध्याकाळपासूनच सुरू झाली होती.

नागपुरचा राजा या गणपतीची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. नागपुरच्या चितार ओळीतून या गणपतीच्या मिरवणूकीला सुरूवात झाली. रेशिमबागमध्ये नागपूरच्या राजाची प्रतिष्ठापना केली जाते. नागपूरच्या राजाच्या मिरवणूकीत घोडे, उंट आणि पारंपारिक वेशातील मंडळाचे कार्यकर्ते ही विशेषता होती.

दरम्यान, आज गणपती बाप्पांचं आगमन होतंय आणि गणपती उत्सवासाठी पुणे शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त सतिश माथूर यांनी दिली. गणपती उत्सवा दरम्यान शहरात कोणतीही दूर्घटना घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. एन एस एस च्या तीन हजार विद्यार्थ्यांना पोलीस विभागातर्फे प्रशिक्षण देण्यात आलं आहे. तसेच गणेश मंडळाच्या सिक्युरीटी युनिट आणि ट्रॅफीक मॅनेजमेट युनीटलाही पोलीस विभागातर्फे प्रशिक्षण देण्यात आलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 29, 2014 09:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close