S M L

अखेर ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली अडकले विवाहबंधंनात

Samruddha Bhambure | Updated On: Aug 29, 2014 01:06 PM IST

 अखेर ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली अडकले विवाहबंधंनात

29 ऑगस्ट :  हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता ब्रॅड पिट आणि अभिनेत्री अँजलिना जोली अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. 9 वर्षे एकत्र राहिल्यावर अखेर दोघांनीही शनिवारी फ्रान्समध्ये लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नात त्यांचे कुटुंबिय आणि जवळचे मित्र सहभागी झाले होते.

विशेष म्हणजे ब्रॅड पिट आणि अँजलिना जोलीच्या लग्नाला त्यांची सहाही मुलं उपस्थित होती. मि. अँड मिसेस.स्मिथ या चित्रपटादरम्यान दोघांची ओळख झाली आणि त्याचं प्रेमात रुपांतर झाले. ब्रॅड पिटचे हे दुसरे लग्न असून यापूर्वी त्याने 2000 साली अभिनेत्री जेनिफर ऍनिस्टशनी लग्न केलं होतं, मात्र 2005 साली ते वेगळे झाले. तर अँजलिना जोलीचं हे तिसरे लग्न आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 29, 2014 10:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close