S M L

पीव्ही सिंधूचं मेडल पक्क, सेमीफायनलमध्ये धडक

Sachin Salve | Updated On: Aug 29, 2014 09:09 PM IST

पीव्ही सिंधूचं मेडल पक्क, सेमीफायनलमध्ये धडक

p v sindhu29 ऑगस्ट : वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये भारताची बॅटमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने इतिहास घडवलाय . सिंधूनं चॅम्पियनशीपमध्ये मेडल निश्चित केलंय.

सिंधूनं क्वार्टरफायनलमध्ये चीनच्या वँग शिशियानचा 19-21, 21-19, 21-15 असा पराभव करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनलमधील प्रवेशाने सिंधूचं मेडल आता पक्कं झालंय.

सलग दोन वर्ल्ड चॅम्पियनशिप्समध्ये मेडल पटकावणारी सिंधू ही भारताची एकमेव बॅडमिंटन स्टार ठरली आहे. वर्ल्ड नंबर 11 सिंधूने गेल्यावर्षीही वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ब्राँझ मेडलची कमाई केली होती. पण सायना नेहवालला मात्र क्वार्टर फायनलमध्ये वर्ल्ड नंबर 1 आणि ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट ली झुरीकडून पराभव पत्करावा लागलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 29, 2014 08:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close