S M L

इंग्लंडचा धुव्वा, भारताचा 6 विकेटने शानदार विजय

Sachin Salve | Updated On: Aug 30, 2014 10:21 PM IST

इंग्लंडचा धुव्वा, भारताचा 6 विकेटने शानदार विजय

  30 ऑगस्ट : कसोटी सामन्यात पराभवाचा वचपा काढत भारताने सलग दुसर्‍यांदा दणदणीत विजय मिळवला आहे. ट्रेंट ब्रिजला रंगलेल्या तिसर्‍या वन डेत टीम इंडियाने इंग्लंडचा 6 विकेटनं पराभव केला आहे. या विजयाबरोबरच 5 मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

कॅप्टन महेंद्रसिंग धोणीचा टॉस जिंकून पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय बॉलर्सनं खरा ठरवला. भारताने इंग्लंडला 227 रन्सवर ऑलआऊट केलं. तर भारतातर्फे अंबाती रायडूनं शानदार हाफ सेंच्युरी ठोकत भारताला विजय मिळवून दिला. अजिंक्य रहाणे, विराट कोहली आणि सुरेश रैनानं शानदार इनिंग पेश करत रायडूला चांगली साथ दिली.

5 मॅचच्या या सीरिजमध्ये भारताने 2-- ने आघाडी घेतल आहे. या अगोदर भारताने दुसर्‍या वनडेमध्ये 133 रन्सने शानदार विजय झाला होता. तर पहिली वनडे पावसामुळे रद्द करण्यात झाली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 30, 2014 10:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close