S M L

तब्बल दोन महिन्यांनंतर मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी

Samruddha Bhambure | Updated On: Aug 31, 2014 06:55 PM IST

तब्बल दोन महिन्यांनंतर मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी

31 ऑगस्ट :  राज्यात अनेक ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली आहे. मराठवाड्यात तब्बल दोन महिन्यांनी पावसाचा जोर वाढल्यानं दुष्काळामुळे चिंतेत असलेला बळीराजा सुखावला आहे. परभणीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे धरणांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे.

पावसामुळे मानवत तालुक्यातल्या 3 गावांचा संपर्क तुटला आहे. हिंगोली जिल्ह्यातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे. पण, धरणं, तलाव आणि विहिरींच्या पाणीपातळीत मात्र वाढ झाली नाही. उस्मानाबाद जिल्यात गेल्या 2 दिवसापासून संततधार सुरू आहे. या पावसाने जिल्ह्यातले तलाव, नदी आणि धरणातल्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

दरम्यान, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याला पाणी पुरवठा करणार्‍या मांजरा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. तर वाशी तालुक्यातल्या फक्राबाद, पारा आणि वाशी गावांचा संपर्क तुटला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 31, 2014 06:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close