S M L

राज्यभरात पावसाची दमदार हजेरी

Samruddha Bhambure | Updated On: Sep 1, 2014 02:47 PM IST

राज्यभरात पावसाची दमदार हजेरी

15972058481406871327

01 स्पटेंबर : कधी नव्हे ते हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आहे मुंबईसह राज्यभरात शनिवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. राज्यात गणपती बाप्पाचे आगमन होताच पावसानेही जोर धरला आहे.

रविवारची सुट्टी असल्याने मुंबईच्या रस्त्यांवर कमी गर्दी होती, पण आज (सोमवारी) सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. नवी मुंबईतही रात्रीपासून संततधार सुरू आहे तर पुण्यातही सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणातही गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. दरम्यान आजही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

काल (रविवार) सकाळपासूनच मुंबई शहरात आणि उपनगरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पावसाचा फटका मुंबईच्या वाहतुकीवर बसला आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे जाम, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत तर वेस्टर्न एक्स्प्रेसवरही वाहतूक धीम्या गतीनं आहे. पावसाचा मुंबईच्या लोकल ट्रेनवरही परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 15 मिनिटं उशिरानं तर हार्बर रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहेत.

मुंबईत काल संध्याकाळी 7 ते आज सकाळी 7 पर्यंतचा पाऊस

  • पश्चिम उपनगर : 77 मिली
  • पूर्व उपनगर : 64 मिली
  • दक्षिण मुंबई : 54 मिली

पावसासाठी तहानलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यावरही वरुणराजाने कृपा केलीय. विदर्भात पावसानं हजेरी लावलीय. अकोल्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे काल वीज पडून 3 शेतमजूर महिलांचा मृत्यू झाला असून, पावसाचा जोर अजूनही कायम आहे. असाच मुसळधार पाऊस सुरु राहिल्यास अकोला जिल्ह्यातील नदीनाल्यांना पूर आला आहे.

विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे विदर्भातील बळीराजा राजा सुखावलाय. यावेळी कमी पावसामुळे यवतमाळ, अकोला, वाशीम या जिल्ह्यांमधील 43 तालुक्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट उभे राहिले होते मात्र आता झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी सुखावलाय

गणपती बाप्पाचे आगमन होताच मराठवाड्यातही पावसाचे दमदार आगमन झाले आहे. मराठवाड्यात गेल्या पाच दिवसांपासून चांगला पाऊस पडतोय. या पावसामुळे शेतकरी चांगलाच सुखावला आहे.मराठवाड्यातील जवळपास सर्वच प्रकल्पांमध्ये पाण्याचा साठा वाढायला सुरुवात झाली आहे. अनेक दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे सोयाबीन, कापूस, मूग, तूर यांसारख्या पिकांनी माना खाली टाकल्या होत्या. पण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पावसाच्या दमदार हजेरीनं पिकांना आता नवजीवन मिळालं आहे.

मराठवाड्यात झालेल्या पावसाची आकडेवारी

  • औरंगाबाद : 52 टक्के
  • बीड : 40 टक्के
  • लातूर : 41 टक्के
  • परभणी : 47टक्के
  • उस्मानाबाद : 42 टक्के
  • नांदेड : 52 टक्के
  • हिंगोली : 50 टक्के

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 1, 2014 12:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close