S M L

सेना-भाजपची युती तुटणार नाही : शिवसेना

Samruddha Bhambure | Updated On: Sep 1, 2014 04:35 PM IST

सेना-भाजपची युती तुटणार नाही : शिवसेना

2Uddhav_jallosh

01 सप्टेंबर : शिवसेना-भाजप युतीमध्ये तणावअसल्याच्या बातम्या म्हणजे अफवा असल्याचं शिवसेनेतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. 'महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारांची गाठ पक्की असल्यानेच युतीची गाठ सुटणार नाही असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे. सेना - भाजपची युती तुटणार नाही असा विश्वासही त्यात व्यक्त करण्यात आला आहे.

हरियाणामध्ये भाजप आणि हरियाणा जनहित काँग्रेसची युती तुटल्याने महाराष्ट्रातही शिवसेना-भाजपची युती तुटेल अशा बातम्या येताहेत, मात्र त्या अफवाच आहेत असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे. महायुतीतल्या घटक पक्षांचे जागावाटप पूर्ण होत आले आहे. आता शिवसेना आणि भाजपमधल्या जागावाटपाची चर्चा सुरू होणार आहे. पण त्यापूर्वीच भाजपने दबावाचं राजकारण सुरू केलं आहे.

'राज्यात भाजपला 50 टक्के जागा मिळाव्यात, अशी भाजप अध्यक्षांची भूमिका आहे, असं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आयबीएन लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत स्पष्ट केलं आहे. तर गडकरींच्या या वक्तव्याला उत्तर देताना स्वबळाचं आव्हान देत असाल तर आम्ही शिवसैनिकही सज्ज असल्याचं शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे. सध्या राज्यात 'वेगळं व्हायचंय मला' हे गडकरी निर्मित नाट्य सुरू झाल्याची कोपरखळीही रावतेंनी लगावली. त्याच पार्श्वभूमीवर 'सामना'तून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात

'शिवसेना आणि भाजप युतीमध्ये तणाव वगैरे असल्याच्या अफवा अधूनमधून उठत असतात, मात्र आम्ही शिवसेना आणि भाजपात कोणताही तणाव किंवा अस्वस्थता असल्याच्या बातम्यांचा इन्कार करत आहोत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या अफवांचे पेव जास्तच फुटणार आहे. महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युती हा राजकीय उथळपणाचा खळखळाट नसून हिंदुत्वाचा अथांग सागर असल्याचे लेखात म्हटलं आहे. शिवसेना-भाजपचे हिंदुत्ववादी आणि अखंड महाराष्ट्रवादी राज्य यावे. हरियाणात युती तुटल्याने आता महाराष्ट्रातही शिवसेना आणि भाजपचं फाटेल असं काही पोटदुख्यांना वाटतं आहे. पण त्यांचे हे मनोरथ पूर्ण होण्याची शक्यता नाही. हरियाणा आणि बिहारमध्ये हिंदुत्ववादी विचारांची गाठ नसल्यानेच तिथे गाठ सुटली. पण महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारांची गाठ पक्की असल्यानेच ती तुटणार नाही. याचे भान शिवसेनेबरोबरच भाजपलाही आहे.'

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 1, 2014 11:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close