S M L

वनकर्मचार्‍यांच्या संपाचा आज सातवा दिवस

Samruddha Bhambure | Updated On: Sep 1, 2014 02:48 PM IST

वनकर्मचार्‍यांच्या संपाचा आज सातवा दिवस

01 सप्टेंबर :  वेतनवाढीच्या मुद्यांवरून वनकर्मचार्‍यांचे सोमवारपासून राज्यात आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा सातवा दिवस असूनही अजूनही वन मंत्रालयाकडून आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. यामुळे जिल्ह्यातलं 1517 चौरस किलोमिटर वनक्षेत्रफळ धोक्यात आलं आहे. आंदोलनादरम्यान वृक्षतोड आणि वन्यप्राण्यांच्या शिकारी झाल्याचा संशय संपावरच्या वनकर्मचार्‍यांनी व्यक्त केलं आहे.

राज्यातले 25 हजार वनकर्मचारी सातवा दिवसांपासून संपावर आहेत. पण, सरकारनं त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे जंगलांमध्ये सागवनाची तस्करी आणि शिकार वाढलीय. वनकर्मचार्‍यांच्या संपामुळे वन अधिकार्‍यांना पेट्रोलिंगचं काम करायला लागतं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 1, 2014 10:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close