S M L

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या यशात मनसेचा महत्त्वाचा वाटा

16 मे लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं आहे. त्यांच्या या यशात मोठा वाटा आहे मनसेचा. कारण मनसेनं शिवसेना-भाजपची मतं खाल्लीत. त्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले असल्याची अशी कबुली काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पक्षाच्या नेत्यांनी दिली आहे. मराठी माणसासाठी लढा देण्याची भाषा करत मनसेने 15 व्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेसमोर चांगलंच आव्हान उभं केलं असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीनंच मनसेला छुपी मदत केल्याचा आरोप शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केला. बहुदा याचाच प्रत्यय या निवडणुकीत आला, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मनसेमुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीला यश मिळाला असा निष्कर्ष आता युतीचे नेतेही काढू लागले आहेत. ' राज ठाकरेंच्या मनसेच्या निमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादीने मराठी मतं फोडली, ' असं मत भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही आता ही बाब मान्य करू लागलेत. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मनसेमुळे निवडणुकीत फायदा झाल्याची कबुली दिली आहे. मनसेनं मुंबईत आणि मुंबईबाहेर एकूण 12 उमेदवार उभे केले होते. या उमेदवारांनी शिवसेना-भाजपच्या उमेदवारांची बरीच मतं खाल्लीत. उदाहरणच द्यायचं झालं तर उत्तर पूर्व मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांना 2 लाख 13 हजार 505 मतं मिळाली. भाजपचे किरीट सोमय्यांना 2 लाख 10 हजार 572 मतं मिळाली. या दोघांमधला फरक आहे, फक्त 2 हजार 933 मतांचा. आणि याच मतदार संघात मनसेच्या शिशीर शिंदेंना तब्बल 1 लाख 95 हजार 148 मतं मिळालीत. उत्तर पश्चिम मुंबईत काँग्रेसचे गुरुदास कामत 2 लाख 53 हजार 899 मतं मिळून विजयी झाले. तर पराभूत झालेले शिवसेनेचे उमेदवार गजानन किर्तीकर यांना 2 लाख 15 हजार 484 मतं मिळाली. याच मतदारसंघात मनसेच्या उमेदवार शालिनी ठाकरेंना 1 लाख 23 हजार 885 मतं मिळाली. म्हणजे केवळ 38 हजार 387 मतांनी किर्तीकर पराभूत झालेत. ठाण्यातले राष्ट्रवादीचे उमेदवार संजीव नाईक 3 लाख 1 हजार मतं मिळवून विजयी झाले. शिवसेनेचे पराभूत उमेदवार विजय चौगुले यांना 2 लाख 51 हजार 980 मतं मिळाली. म्हणजे चौगुले यांचा 49 हजार 20 मतांनी पराभव झाला. इथं मनसेच्या राजन राजे यांना 1 लाख 34 हजार 840 मतं मिळालीत. नाशिकमध्ये तर मनसेचा उमेदवार फक्त 22 हजार 32 मतांनी हरलाय. राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार समीर भुजबळ यांना 2 लाख 38 हजार 693 मतं मिळाली. शिवसेनेचे दत्ता गायकवाड यांना 1 लाख 58 हजार 139 मतं मिळालीत. आणि मनसेचे हेमंत गोडसे यांना 2 लाख 16 हजार 661 मतं मिळाली. यातून मनसेनं आपलं उपद्रवमूल्य दाखवून दिलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 16, 2009 12:46 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2009 12:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close