S M L

कोल्हापूर स्फोटाचं गुढ उकललं, पैशाच्या वादातून घडवला स्फोट

Sachin Salve | Updated On: Sep 2, 2014 05:00 PM IST

कोल्हापूर स्फोटाचं गुढ उकललं, पैशाच्या वादातून घडवला स्फोट

kol blast02 सप्टेंबर : कोल्हापूर शहराजवळच्या उजळाईवाडीमध्ये 23 ऑगस्ट रोजी गावठी बॉम्बचा स्फोट झाला होता. या स्फोटाचा तपास उलगडण्यात पोलिसांना यश आलंय. आर्थिक देवघेवीतून बदला घेण्यासाठीचं चायनिज सेंटर चालवणार्‍या त्यांच्या मित्रानंच हा स्फोट केल्याचं समोर आलंय. याप्रकरणी स्फोट घडवणारा अविनाश बन याला पोलिसांनी अटक केलीय.

कोल्हापुरात मागील महिन्यात 23 ऑगस्ट रोजी शाहू टोलनाक्याजवळ उजळाईवाडीमध्ये गावठी बॉम्बच्या स्फोट झाल्याच्या घटनेनं एकच खळबळ उडाली होती. या स्फोटामध्ये 2 तरुण किरकोळ जखमी झाले होते.

या घटनेनंतर एटीएसच्या पथकाने घटनास्थळीची पाहणी केली होती. घटनास्थळावरून एक इलेक्ट्रिक सर्किट आणि छर्रेसुद्धा आढळून आले होते. अखेर पोलिसांना या स्फोटाचं गुढ उकलण्यात यश आलं.

अविनाश बन यानं आर्थिक देवघेवीतून बदला घेण्यासाठीचं हा स्फोट घडवला होता. त्याने स्वतःच साहित्य घेऊन हा गावठी बॉम्ब तयार केला होता. आणि चायनिज सेंटर चालवणारे 2 युवक म्हणजेच श्रीधर खुटाळे आणि मनोज परब यांचा बदला घेण्यासाठीच बन यानं हा स्फोट घडवून आणल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलंय. दरम्यान, बन हा पुण्याच्या कात्रज परिसरातील रहिवासी असून त्याच्यावर यापुर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 2, 2014 05:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close