S M L

महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही, सेनेचा भाजपला इशारा

Samruddha Bhambure | Updated On: Sep 3, 2014 03:13 PM IST

uddhav thackray

03  सप्टेंबर :  भाजप असो किंवा इतर कुणीही, महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे स्वप्न कुणी पाहत असेल तर आम्ही ते पूर्ण होऊ देणार नाही असं शिवसेने म्हटलं आहे. सामनाच्या अग्रलेखातून स्वतंत्र विदर्भाची मागणी करणार्‍या विरोधकांसोबतचं भाजपवरही जोरदार टीका करण्यात आली आहे. स्वतंत्र विदर्भाच्या भाजपच्या भूमिकेवर शिवसेनेने टीका केली असून कुणालाही महाराष्ट्राचे तुकडे पाडू देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे.

'भाजप असो किंवा अन्य कुणी, महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे स्वप्न कुणी पाहत असेल तर आम्ही ते पूर्ण होऊ देणार नाही', असं अग्रलेखात म्हटलं असून महाराष्ट्र विभाजनाला स्पष्ट विरोध दर्शवण्यात आला आहे.

दरम्यान या लेखात काँग्रेसवरही कडाडून टीका करण्यात आली आहे. मराठी जनतेने काँग्रेसविरोधात रणशिंग फुंकले असून लोकसभा निवडणुकीत हे स्पष्ट दिसले आहे. आगामी विधनासभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जरी रणशिंग फुंकले असले तरी त्यांचा पराभव निश्चित आहे, असे लेखात म्हटलं आहे.

काँग्रेसवर हल्लाबोल

'आता काही झालं तरी काँग्रेसच्या मुडद्यात जान फुंकली जाणार नाही. ढोल वाजवा नाही तर रणशिंग फुंका. मराठी जनतेनं काँग्रेसविरोधात चले जावचं रणशिंग फुंकलंय. तिरडीवर बांधलेला मुडदा कधी रणशिंग फुंकतो का? सगळे आजी माजी मुख्यमंत्री एकत्र येऊन काँग्रेस पक्षात जान आणू पाहतायत. पण प्रत्येकालाच आपल्या मतदारसंघात पळता भुई थोडी झालीय. खुद्द मुख्यमंत्र्यांनाही कराडमध्ये सुरक्षित मतदारसंघ शोधताना घाम फुटलाय. काँग्रेसने जरी हे रणशिंग फुंकलं असेल तरीही त्यांच्या या रणशिंगास पिपाणीइतकंही महत्व उरलेलं नाही. आम्ही चव्हाण यांचे अभिनंदन करतो. भाजप असो किंवा अन्य कुणी, महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे स्वप्न कुणी पाहत असेल तर आम्ही ते पूर्ण होऊ देणार नाही'.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 3, 2014 01:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close