S M L

राष्ट्रवादीची नाराजी, जाहिरातीत मुख्यमंत्रीच का ?

Sachin Salve | Updated On: Sep 3, 2014 08:20 PM IST

राष्ट्रवादीची नाराजी, जाहिरातीत मुख्यमंत्रीच का ?

03 सप्टेंबर : काँग्रेस-राष्ट्रवादीमधली कुरबुरी वाढतच चाललीय.आधी जागावाटपावरून आणि आता जाहिरातींवरून आघाडीत जुंपली आहे. आघाडी सरकारच्या जाहिरातींवर राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे. या जाहिराती काँग्रेसकेंद्रीत असल्याचा आरोप करण्यात आलाय. हे काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आहे पण जाहिरातींमध्ये मुख्यमंत्रीच का? असा सवाल राष्ट्रवादीने केला आहे. हे सरकार आघाडीचं असताना काँग्रेसच्या कुरघोडीमुळे आघाडी धर्माला तडा जातोय, अशी खंत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आयबीएन लोकमतकडे व्यक्त केलीये.

विधानसभा निवडणुकाच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच आचारसंहिता लागू होईल त्यामुळे राज्य सरकारने जाहिरातींचा धडाका लावलाय.  अशा आशयाची जाहीर सर्वत्र झळकत आहे. मात्र वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिराती काँग्रेस केंद्रीत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीने केला. राज्यात सरकार काँग्रेस-राष्ट्रवादीचं आहे पण जाहिरातींमध्ये फक्त मुख्यमंत्रीच आहेत, त्याबद्दल राष्ट्रवादीनं नाराजी व्यक्त केली. काँग्रेसच्या कुरघोडीमुळे आघाडी धर्माला तडा जातोय, अशी खंत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आयबीएन लोकमतकडे व्यक्त केली होती. 2004 पासून आम्ही आघाडी टिकवलेली आहे. दोन विधानसभा आणि दोन लोकसभा निवडणुकीत आम्ही एकत्र लढलोत. आघाडी करायचं काँग्रेसच्या मनात असेल तर त्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी. हे सरकार कोण्या एका पक्षाचं नाहीये. आज वर्तमानपत्रात ज्या जाहिराती आल्यात त्यात जणू हे सरकार एकाच पक्षाचं सरकार आहे असा आभास निर्माण करण्यात आला असून हे अत्यंत दुर्देवी आहे. हा प्रकार म्हणजे आघाडीच्या भावनेला तडा जाणारं आहे. ह्या बाबतीत योग्य ती भूमिका मुख्यमंत्री घेतील अशी अपेक्षा तटकरेंनी व्यक्त केली. मात्र, हा प्रकार म्हणजे नकळत झालेली चूक आहे, असा खुलासा काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी थोड्या वेळापूर्वी आयबीएन लोकमतशी बोलताना केला, तसंच ही चूक सुधारण्यात येईल असंही सांगितलं.

सरकारची जाहिरातबाजी

  • - सरकारी जाहिरांतासाठी बजेट 2014-2015 मध्ये 93 कोटींची तरतूद
  • - अतिरिक्त खर्चातून विभागवार जाहिरातींवर खर्च
  • - काँग्रेसकडील विभागाच्या जाहिरातींमध्ये मुख्यमंत्री आणि त्यांची मुलाखत
  • - दर महिन्याला जाहिरातींचं बजेट वाढलं.
  • - सरकारने जाहिरातींसाठी कोट्यावधी रूपयाचं बजेट केल्याचं विरोधकांचा आरोप

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 3, 2014 06:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close