S M L

मुंबईत वीज का बंद झाली?, 'टाटा पॉवर'ची होणार चौकशी

Sachin Salve | Updated On: Sep 3, 2014 05:08 PM IST

मुंबईत वीज का बंद झाली?, 'टाटा पॉवर'ची होणार चौकशी

tata powar03 सप्टेंबर : एकीकडे गणेशोत्सवाची धूम सुरू आहे मात्र मुंबईकरांची मंगळवार मात्र अंधारात गेली. टाटा पॉवरच्या ट्रॉम्बे वीजपुरवठा केंद्रात बिघाड झाल्यामुळे मुंबईतील काही भागात अंधार पसरला होता. या प्रकरणाची दखल घेत राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहे. आठवड्याभरात या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याची सुचना करण्यात आलीये.

टाटा पॉवरच्या ट्रॉॅम्बे वीजपुरवठा केंद्रात मोठा बिघाड झाल्याने मंगळवारी मुंबईच्या काही भागात लोडशेडिंग करण्यात आलं. वीजपुरवठा केंद्रात बिघाड झाल्यानं 500 मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला होता.

त्यामुळे दादर, माहीम, धारावी, सायन, प्रभादेवी, परेल, भायखळा, चिंचपोकळी, गिरगाव, मुंबई सेंन्ट्रल या भागात लोडशेडिंग करण्यात आलं होतं. या घटनेची चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

ऊर्जा खात्याच्या प्रधान सचिवाकडून चौकशी होणार आहे. वीज का बंद झाली त्याच्या कारणांची चौकशी करुन आठवडाभरात सरकारला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 3, 2014 05:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close