S M L

मोडकसागर धरणामध्ये यशस्वी 'लेक टॅपिंग'

Sachin Salve | Updated On: Sep 3, 2014 05:33 PM IST

मोडकसागर धरणामध्ये यशस्वी 'लेक टॅपिंग'

modaksagar dam lek tapping03 सप्टेंबर : मुंबई शहराला अधिक दाबानं पाणीपुरवठा करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे 'लेक टॅपिंग' च्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा अखेरचा टप्पा पार पडला. सुरुंग स्फोटाद्वारे धरणातील सर्वात खालच्या पातळीवरचा बोगदा खुला करण्यात आला. त्यामुळे मुंबईकरांवरचे पाणीसंकट कमी होणार आहे. कोयना धरणानंतर दुसरा प्रयोग यशस्वीपणे पार पडलाय.

मुंबईकरांची पाणीटंचाई दूर करणारी मुंबई महापालिकेने 'मोडक सागर बोगदा प्रकल्प' प्रकल्प हाती घेतलाय. मोडकसागर हे धरण वैतरणा नदीच्या सर्वात खालच्या बाजूला बांधण्यात आलंय. त्यापेक्षा अधिक उंचीवर मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा ही दोन धरणे आहेत. या दोन्ही धरणातील पाणी मोडकसागरमध्ये आणले जाते. यासाठी पूर्वीच दोन बोगदे बांधण्यात आले आहे. पण पाण्याच्या अधिक दाबासाठी धरणाच्या खालच्या पातळीवरील बोगद्यासाठी मात्र सुरुंगस्फोट आवश्यक होता. आज दुपारी दीडच्या सुमारास खालच्या पातळीत सुरुंगस्फोट घडवून आण्यात आला. कोयना धरणात दोन वर्षांपूर्वी असाच लेक टॅपिंगचा प्रयोग करण्यात आला होता. त्यानंतर महाराष्ट्रात हा दुसराच प्रयोग यशस्वीपणे पार पडलाय. मोडकसागर तलावात झालेल्या लेक टॅपिंगमुळे मुंबईकरांना जास्त पाणी उपलब्ध होणार आहे असा विश्वास पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटेंनी व्यक्त केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 3, 2014 05:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close