S M L

...तर वेगळा विचार करावा लागेल, रिपाइंचा महायुतीला इशारा

Sachin Salve | Updated On: Sep 3, 2014 07:41 PM IST

...तर वेगळा विचार करावा लागेल, रिपाइंचा महायुतीला इशारा

dangale on udhav03 सप्टेंबर : जागावाटपावरून महायुतीत कुरबुरी सुरूच आहेत. निवडणुकीसाठी योग्य जागा मिळत नसल्याने वेगळा विचार करावा लागेल असा इशारा रिपाइंने महायुतीला दिलाय. जागा वाटपावरून दिलेलं आश्वासन महायुतीतनं पाळलं नाही, अशी नाराजी रिपाइं नेते अर्जुन डांगळे यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा रिपाइंने शिवसेनेशी हातमिळवणी केली तेव्हा सन्मानपूर्वक वागणूक तर दिलीच पण रिपाइंला शब्दही दिला होता. पण आता महायुतीकडून हा शब्द पाळला जातो की नाही असा संशय आहे. मुंबई महापालिकेत विविध समिती आणि प्रभार समित्यांवर सदस्य निवडत असताना रिपाइंला विचारात घेतले जात नाही साफ साफ डावलेले जाते अशी टीका अर्जुन डांगळे यांनी केली. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत डांगळेंनी थेट महायुतीवर युतीवर निशाणा साधला. विशेष म्हणजे रिपाइंने महायुतीकडून अधिक जागेची मागणी केलीये. पण युतीत जागावाटपाचा तिढा न सुटल्यामुळे घटकापक्षांना वेटिंगवर थांबावे लागले आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहे. दरम्यान, भाजपचे नेते विनोद तावडे आणि रिपाइंचे नेते सुमंतराव गायकवाड यांच्यात जागावाटपाची चर्चा झाली. रिपाइंनं भाजपकडे 8 जागांची मागणी केली आहे. याबाबत भाजप 2 दिवसांत निर्णय घेणार आहे. ही चर्चा सकारात्मक झाल्याचा दावा भाजपने केलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 3, 2014 07:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close