S M L

अखेर मुहूर्त मिळाला, मनसेची ब्ल्यू प्रिंट 10 सप्टेंबरला !

Sachin Salve | Updated On: Sep 6, 2014 10:31 PM IST

loksabha_raj03 सप्टेंबर : येणार...येणार...म्हणून चर्चेचा धुराळ उडवणार्‍या मनसेच्या 'ब्ल्यू प्रिंट'ला अखेर मुहूर्त मिळालाय. येत्या 10 सप्टेंबरला मुंबईत एका कार्यक्रमात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 'ब्ल्यू प्रिंट'चं प्रकाशन करणार आहेत.

ब्ल्यू प्रिंटचं मनसे फक्त आश्वासन देते प्रिंट काही येत नाही अशी टीका सातत्यानं होत होती. आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने मनसेनं अखेर महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न लोकांसमोर मांडणार आहे.

'मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा' अशी गर्जना करत राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावानं पक्ष स्थापन केला. मराठीचा मुद्दा आणि महाराष्ट्राचा विकासावर भाष्य करत मनसे आता आपल्या दुसर्‍या विधानसभा निवडणुकीला सामोरं जातं आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी ब्ल्यू प्रिंट सादर करणार असं गोड आश्वासन दाखवलं होतं. पण ही ब्ल्यू प्रिंट कशी असणार ? कधी येणार आणि नेमकं तिचं स्वरूप कसं असणार यावरुन बरीच चर्चा रंगली. लोकसभा निवडणुकीत सुपडा साफ झाल्यानंतर राज यांनी आता अखेरीस आपली ब्लू प्रिंट सादर करण्याचं मनाशी पक्क केलंय. मध्यतंरी ऑगस्ट महिन्यातच ब्लू प्रिंट सादर होईल अशी चर्चा रंगली होती.

पण राज यांनी ही केवळ सोशल मीडियावर चर्चा होती असं काही अजून ठरलं नाही, जे काही ठरवायचं आहे ती लवकरच जाहीर करेन असं राज यांनी स्पष्ट केलं होतं. विशेष म्हणजे मध्यंतरी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'चला महाराष्ट्र घडवूया' अशी साद देत सेनेचं व्हिजन डॉक्युमेंट सादर केलं. त्यामुळे मनसेची ब्लू प्रिंट कधी येणार अशी कुजबूज सुरू झाली होती. अखेरीस येत्या 10 सप्टेंबरला ब्ल्यू प्रिंटला मुहूर्त मिळाला आहे. आता ही ब्ल्यू प्रिंट कशी असणार याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 3, 2014 10:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close