S M L

'सेक्स रॅकेट' प्रकरणी 'मकडी' फेम श्वेता बसूला अटक

Samruddha Bhambure | Updated On: Sep 4, 2014 02:27 PM IST

'सेक्स रॅकेट' प्रकरणी 'मकडी' फेम श्वेता बसूला अटक

04 सप्टेंबर : 'मकडी' या चित्रपटासाठी 12 वर्षांपूर्वी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या श्वेता बसू प्रसाद या 23 वर्षीय अभिनेत्रीला वेश्या व्यवसायाच्या आरोपाखाला रविवारी रात्री अटक करण्यात आली आहे. तिला पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले आहे. हैदराबादच्या पॉश हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकला असताना श्वेता बसू रंगेहात पकडली गेली आहे. श्वेतावर 'सेक्स रॅकेट'शी संबंध असल्याचा आरोप आहे.

2002 मध्ये रिलीज झालेल्या 'मकडी' चित्रपटातल्या तिच्या लक्ष वेधी भूमिकेसाठी श्वेताला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. त्यासोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'इकबाल' चित्रपटात देखील श्वेताने अभिनेता श्रेयस तळपदेच्या लहान बहिणीची भूमिका साकारली होती. तसेच याआधी एकता कपूरच्या 'कहानी घर घर की' या मालिकेमध्येही श्वेताने काम केले आहे. श्वेता सध्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत होती.

दरम्यान, 'करिअरमध्ये मी अनेक चुकीचे निर्णय घेतले. परिस्थितीमुळे आपल्याला वेश्याव्यवसाय करावा लागत असल्याचं सांगत, कुटुंब चालवण्याची जबाबदारी माझ्यावर असल्याने मला हे करावं लागलं असं तिने म्हटलं आहे. सध्या तिला पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2014 10:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close