S M L

'मोदींच्या भाषणाची सक्ती करण्यापेक्षा शाळेत सुविधा पुरवा'

Sachin Salve | Updated On: Sep 4, 2014 04:02 PM IST

'मोदींच्या भाषणाची सक्ती करण्यापेक्षा शाळेत सुविधा पुरवा'

abba on modi04 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शिक्षक दिनादिवशीची भाषण सक्ती चुकीची असल्याचं मत गृहमंत्री आर.आर पाटील यांनी व्यक्त केलंय. भाषण ऐकण्याची सक्ती करण्यापेक्षा मोदींनी शाळांमध्ये कॉम्प्युटर्स-चांगल्या खोल्या अशा पायाभूत सुविधा पुरवाव्यात असा टोलाही आर.आर. पाटील यांनी लगावलाय. पुण्यात ते पत्रकारांशी ते बोलत होते.

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींनी आधी वेगळ्या विदर्भाबाबत भूमिका स्पष्ट करावी आणि मग महाराष्ट्राराच्या मुख्यमंत्रपदाची बात करावी अशी फटकेबाजीही आबांनी केली. आघाडीचं जागावाटप रखडलंय याला राष्ट्रवादी जबाबदार नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे जादा खासदार निवडून आलेत म्हणून विधानसभेला जास्त जागा पाहिजेत ही मागणी गैर नाही पण 144 का 150 हा आकडा शरद पवार ठरवतील असा चिमटा पाटलांनी काँग्रेसला काढला. तसंच डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला असला तरी पुणे पोलिसांनी स्वस्थ बसू नये असं सांगतानाच आरोपी पकडण्यात यशस्वी होऊ असा आत्मविश्वासही आर. आर. पाटील यांनी व्यक्त केला. पुण्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यालयाची तोडफोड करणारे आरोपी कुठल्याही पक्षाचे अगर संघटनेचे असले तरी त्यांना पकडू असी ग्वाहीही आर. आर. पाटील यांनी दिली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2014 04:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close