S M L

...ही भूमी बाळासाहेब ठाकरेंची -अमित शहा

Sachin Salve | Updated On: Sep 4, 2014 11:21 PM IST

...ही भूमी बाळासाहेब ठाकरेंची -अमित शहा

04 सप्टेंबर : ...ही भूमी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहु महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांची असून ही भूमी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आहे असं सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी युतीतला तणाव दूर करण्याचा प्रयत्न केला. मुंबईत षणमुखानंद हॉलमध्ये झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आघाडी सरकारवर सडकून टीका केली. हे सरकार घोटाळेबाज असून गेली 15 वर्ष यांनी जनतेला लुटलं आता यांना सत्तेवर खाली खेचण्याची वेळ आलीये असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबई दौर्‍यावर आहेत. त्यांनी दुपारी शिवाजी पार्कवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं. आज रात्री ते मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. त्यापुर्वी मुंबईत षण्मुखानंद हॉलमध्ये भाजपचा विजय संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात शहा यांनी आघाडी सरकार टीकास्त्र सोडले. गेल्या 15 वर्षांपासून आघाडी सरकार महाराष्ट्राला लुटतं आहे. 11 हजार 88 कोटी या सरकारने खाले आहे.  आता महाराष्ट्र राज्य हे काँग्रेसमुक्त करण्याची वेळ आलीये असं आवाहन त्यांनी केलं. महाराष्ट्राचा औद्योगिक विकास खुंटलाय आणि शेतकरी देशोधडीला लागलाय. काँग्रेसला फक्त सत्तेची काळजी आहे तर भाजपला विकासाची काळजी, असंही अमित शहा म्हणाले. राहुल गांधी मौन बाळगून आहे हेच त्यांच्या फायद्याचं आहे असा टोलाही शहा यांनी लगावला.

जागावाटपाचं काय होईल ते नेते ठरवतील, तुम्ही कामाला लागा, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. आपल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा उल्लेख केला. शिवाजी महाराज हे सुराज्याचं प्रतीक आहे. ही भूमी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहु महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांची असून ही भूमी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आहे असंही शहा म्हणाले.

तर देवेंद्र फडणवीस यांनी 'छत्रपतींचा आशीर्वाद, चलो चले मोदी' के साथ असा नारा दिला. या सरकारने सिंचनात एक हजार कोटी खालले.ज्यांनी मुंबई-पुणे हायवे साकारला त्या हायवेवर अगोदरच पुढील वर्षांपर्यंतचा टोल मंजूर केलंय असा आरोपही फडणवीस यांनी केला.या मेळाव्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीच्या माजी मंत्री सूर्यकांता पाटील, काँग्रेसचे भास्करराव पाटील खतगावकर, पेड न्यूज प्रकरणाचे याचिकाकर्ते माधवराव किन्हाळकर नांदेडचे माजी महापौर अजयसिंह बिसेन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2014 10:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close