S M L

वाढीव जागेच्या मागणीवरून युतीत रस्सीखेच

Sachin Salve | Updated On: Sep 5, 2014 09:45 PM IST

वाढीव जागेच्या मागणीवरून युतीत रस्सीखेच

raut vs khadse05 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे मात्र शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. भाजपला जास्त जागा वाढवून हव्यात, ही भाजपची मागणी कायम असल्याचं विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलंय. तर जागावाटप फॉर्म्युल्यात फारसा बदल होणार नाही अशी आडमुठी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे.

युती अभेद्य आहे असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारीच स्पष्ट केलं होतं. मात्र युतीत अजूनही जागावाटपावरुन रस्सीखेच सुरूच आहे. शिवसेनेसोबत जागावाटपावर चर्चा होणार आहे. पण या चर्चेनंतर काही जागा आम्हाला वाढवून पाहिजे आहे. शेवटी मागणी करणे काहीही गैर नाही असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलंय. पण जागावाटपाबाबत असा कोणताही नवीन फॉर्म्युला नाहीये. जी जागा जो जिंकेल किंवा जागा जिंकण्याची ताकद ज्या पक्षात आहे ती जागा त्याला मिळाली पाहिजे असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. लोकसभेत भाजप जास्त जागांवर लढली होती कारण पंतप्रधान भाजपचा होणे गरजेच होतं. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना आता जास्त जागांवर लढणार आहे असंही राऊत म्हणाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 5, 2014 08:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close