S M L

राष्ट्रवादीचंही विसर्जन करा -उद्धव ठाकरे

Sachin Salve | Updated On: Sep 6, 2014 07:31 PM IST

राष्ट्रवादीचंही विसर्जन करा -उद्धव ठाकरे

06 सप्टेंबर : राष्ट्रवादी हा गद्दार पक्ष असून गणपती बाप्पाना जसा निरोप दिला जाणार तसंच राष्ट्रवादीचंही विसर्जन करा असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा इथं शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी प्रचारसभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.

शरद पवार यांनी दुसर्‍यांचे पक्ष फोडून स्वत:चा पक्ष बांधला, आता त्यांच्या पक्षातील नेते दुसर्‍या पक्षात जात आहेत हे पवारांना भोगावं लागत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तसंच राष्ट्रवादी हा गद्दार पक्ष आहे. त्यामुळे त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे असं सांगत 'काँग्रेस राष्ट्रवादी चले जावो' असा नाराही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला. तसंच होय मला राज्य पाहिजे, मला मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न नाही पण हा शिवसेनाप्रमुखांचा मुलगा आहे, जनतेची प्रश्न सोडवणार अशी अपेक्षा माझ्याकडून ठेवली जाते म्हणून या राज्यात सत्ता हवी असंही उद्धव यांनी ठणकावून सांगितलं. तसंच नांदेड या अशोक चव्हाणांच्या गडात येऊन त्यांनी काँग्रेसच्या चव्हाणांवरही चांगलीच टीका केली. या सभेच्या माध्यमातून एकेकाळचे विलासराव देशमुखांचे कट्टर समर्थक आणि माजी आमदार प्रताप चिखलीकर यांनी शक्तीप्रदर्शन केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 6, 2014 04:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close