S M L

अखेर विजयकुमार गावित भाजपमध्ये

Sachin Salve | Updated On: Sep 6, 2014 10:11 PM IST

अखेर विजयकुमार गावित भाजपमध्ये

vijaykumar gavit09 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आणि माजी मंत्री विजयकुमार गावित यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्याआधी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. आज दुपारी भाजप प्रदेश कार्यालयात भाजप नेते याच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

त्यांच्यासमवेत नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, खासदार हीना गावित, भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी उपस्थित होते.

गावित यांच्या भाजपप्रवेशामुळे नंदुरबार जिल्ह्यावर असलेली राष्ट्रवादीची हुकूमत आता संपुष्टात येण्याची चिन्ह आहेत. लोकसभा निवडणुकीत विजयकुमार गावित यांची मुलगी हिना गावित हिनं भाजपमध्ये प्रवेश केला. मुलीच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीने गावित यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली होती. तसंच त्यांच्याकडे असलेलं वैद्यकीय मंत्रीपदही काढून घेतलं होतं. राष्ट्रवादीशी संबंध तुटल्यानंतर अखेरीस गावित आपल्या मुलीपाठोपाठ भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे गावित यांच्या आदिवासी विकास खात्यातल्या भ्रष्टाचाराबाबत त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहे.

मात्र त्यांच्याविरोधात कोणताही मोठा गुन्हा सिद्ध झालेला नाही. राज्य मंत्रिमंडळाने ते दोषमुक्त असल्याचा निर्वाळा दिला होता अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. तर वाढत्या जनाधारामुळे अस्वस्थ होऊन नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी आपल्यावर आरोप केले. आपण कोणताही गैरव्यवहार केल्याचे आपल्याविरोधात झालेल्या चौकशीत आढळलेले नाही. चौकशीत दोषी आढळलो तर राजकीय जीवनातून सन्यास घेईल असं गावित म्हणाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 6, 2014 10:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close