S M L

रामदास आठवलेंना राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्याची काँग्रेसची योजना

17 मे, आरपीआयचे नेते रामदास आठवले यांचा शिर्डी मतदारसंघातून पराभव झाला आहे. त्यामुळे आठवले यांना आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा एकदा स्पर्धा सुरू झाल्याचं कळतंय. काँग्रेसने आठवले यांना राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्याची योजना आखल्याचं समजतंय. आयबीएन लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीने रामदास आठवले यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारीही सुरू केली आहे. आठवले यांना राज्यसभेवर राष्ट्रवादीचे राज्यसभेचे खासदार वाय. पी. त्रिवेदी यांची टर्म येत्या जूनमध्ये संपतेय. शिवाय राज्यसभेवरच असलेल्या सुप्रीय सुळेही लोकसभेवर गेल्यामुळे त्यांची एक जागा रिकामी होईल. या जागेवर पाठवून काँग्रेसला रिपब्लिकन राजकारण्याच्या कोंडीत अडकवण्याचा डाव राष्ट्रवादी खेळेल अशी चर्चा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2009 02:03 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2009 02:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close