S M L

उद्धव ठाकरेंनी केली 'शिव आरोग्य सेवे'ची घोषणा

Samruddha Bhambure | Updated On: Sep 7, 2014 04:41 PM IST

455udhav_thakare

07 सप्टेंबर :  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन 'व्हिजन डॉक्युमेंट' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील पुढच्या टप्प्यात शिव आरोग्य सेवा योजनेची घोषणा केली. सत्तेत आल्यावर शिवसेनेकडून टेली-मेडिसीनच्या माध्यमातून ही आरोग्य सेवा देण्यात येणार आहे.

सॅटेलाईट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने निवडक केंद्रांवर खेड्यापाड्यातील रूग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळणे शक्य होणार असल्याचे, यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी शिवसेना भवनात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून खेड्यातील जनतेला कशाप्रकारे सुविधा देण्यात येईल याचे प्रात्यक्षिकदेखील सादर करण्यात आले. सुरुवातील सात जिल्ह्यांमध्ये शिवआरोग्य योजना राबवण्यात येणार आहे.

सध्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातली आरोग्य केंद्रांची अवस्था बिकट असून, टेली-मेडिसीन या आरोग्य सेवेमुळे ग्रामीण भागांना मुंबईतल्या डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडता येणार आहे आणि शहरातल्या नामवंत डॉक्टरांकडून उपचाराबाबत मार्गदर्शन घेणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2014 03:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close