S M L

सिंधुदुर्गच्या दिपगृहावर 5 दिवसांपासून अडकलेत 3 कर्मचारी

Samruddha Bhambure | Updated On: Sep 7, 2014 04:35 PM IST

सिंधुदुर्गच्या दिपगृहावर 5 दिवसांपासून अडकलेत 3 कर्मचारी

07 सप्टेंबर :  सिंधुदुर्गातल्या निवती दिपगृहावर तीन कर्मचारी गेल्या पाच दिवासांपासून अडकले आहेत. किनार्‍यापासून 22 किलोमीटर आत असलेल्या निवती दिपगृहावर या तीन कर्मचार्‍यांना एक जूनपासून तीन महिन्यांसाठी पाठवण्यात आले होते. 1 सप्टेंबरला त्यांना परत आणणे गरजेचे होते पण हे काम करणार्‍या अधिकृत ठेकेदाराने समुद्रामध्ये बोट नेण्यास नकार दिल्यामुळे हे कर्मचारी अद्यापही तिथेच अडकून आहेत. या कर्मचार्‍यांनी आपल्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असून आपल्यासाठी तातडीची पर्यायी व्यवस्था करावी अशी विनंती केली आहे. या कर्मचार्‍यांजवळची रसद संपत आली असून त्यांची प्रकृतीही खालावत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2014 01:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close