S M L

भारतीय शेअर मार्केटने रचला इतिहास : ट्रेडिंगवर तीन वेळा अपर सर्किट

18 मे,पंधराव्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये युपीए सरकारला मिळालेलं यश आणि स्थिर सरकार आल्याच्या आनंदात आज मार्केट ओपन होताच सेन्सेक्स आणि निफ्टीनं चांगलीच उसळी मारली आहे. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये जबरदस्त तेजीनंतर भारतीय शेअरमार्केटच्या इतिहासात पहिल्यांदाच ट्रेडिंगवर तीन वेळा अपर सर्किट लावण्याची वेळ आली आहे. मार्केट ट्रेडिंग दिवसभरासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेन्सेक्समध्ये थेट 1305 अंशांनी वाढ झाली आणि सेन्सेक्स 13,479 च्या स्तरावर असताना सर्किट लागलं. निफ्टीला आज दोनवेळा सर्किट लावावं लागलं.ओपनिंग झाल्यावर निफ्टीनं सुमारे 531 अंशांची वाढ झाली आणि निफ्टी 4,203च्या स्तरावर पोहचला. निफ्टीत 600 अंशाची वाढ झाल्यावर निफ्टीला दुसर्‍यांदा अपर सर्किट लावावं लागलं. दरम्यान आज मार्केट ट्रेडिंगमध्ये काय स्ट्रॅटेजी ठेवावी याविषयी बीएसई आणि एनएसईच्या सदस्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2009 07:01 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2009 07:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close