S M L

शेतीच्या जमिनीवर घराचे स्वप्न साकारणार

Sachin Salve | Updated On: Sep 8, 2014 06:01 PM IST

शेतीच्या जमिनीवर घराचे स्वप्न साकारणार

home na08 सप्टेंबर : ज्यांना शेतीच्या जमिनीवर घर बांधायचं असेल, त्यांचं स्वप्न आता लवकर पूर्ण होणार आहे. कारण जमीन बिगरशेती करण्यासाठी असणारी आधीची वेळखाऊ आणि किचकट प्रक्रिया आता एकदम सोपी झाली आहे. त्याबद्दलचा निर्णय मंत्रिमंडळाने आधी घेतला होता, आता त्याचा वटहुकूम जारी करण्यात आला आहे.

त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये शेतीच्या जमिनीवर घरं किंवा उद्योग बांधणं सोपं झालंय. आधी त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांचीच परवानगी घ्यावी लागायची. आता ही परवानगी गरजेची नाहीये.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966मधल्या सुधारणेचा वटहुकूम जारी करण्यात आलाय. निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या या निर्णयामुळे बिल्डर लॉबीही खुश होणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 8, 2014 06:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close