S M L

आज होणार निवडणुकीच्या तारखा जाहीर ?

Sachin Salve | Updated On: Sep 9, 2014 11:41 AM IST

56election_counting09 सप्टेंबर : राज्यात आज (मंगळवारी) निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळतेय. निवडणुकांच्या तारखांची घोषणा होताच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणुका एकाच टप्प्यात होतील. तर जम्मू काश्मीर आणि झारखंडच्या निवडणुका त्यानंतर जाहीर केल्या जातील अशीही माहिती मिळतेय. जम्मू - काश्मीरमधल्या पुरामुळे तिथल्या निवडणुकीला उशीर होण्याची शक्यता आहे.

निवडणुकीच्या तारखा मागील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र गणेशोत्सव लक्षात घेता निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या नाही. आता आज तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वीच मतमोजन होण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 9, 2014 08:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close